SPPU Zonal Chess tournament 2019-20

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आंतर विभागीय बुद्धिबळ स्पर्धांना नाशिकच्या सपट अभियांत्रिकी महाविद्यालयात संपन्न झाल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतर विभागीय बुद्धिबळ ( मुले व मुली) स्पर्धा गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर.एच. सपट अभियांत्रिकी महाविद्यालयात दिनांक ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान पार पडल्या.स्पर्धेचा उद्घाटन समारंभ ३१ ऑक्टोबर रोजी गोखले एज्युकेशन सोसायटीचे मा.सचिव सर डॉ. एम.एस. गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ.पी.सी.कुलकर्णी, प्रकल्प संचालक प्रा.पी.एम. देशपांडे सर, संस्थेचे शाखा सचिव डॉ.आर. पी देशपांडे सर, विद्यापीठाचे श्री.मनोहर कुंजीर सर, महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. पी.सी.कुलकर्णी यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे व खेळाडूंचे स्वागत केले. अध्यक्षीय भाषणात सर डॉ. एम.एस. गोसावी सरांनी बुद्धिबळ या खेळाचा आपल्या जीवनातील प्रश्न सोडविण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो त्याविषयी मार्गदर्शन केले.यशस्वी होण्यासाठी प्रयत्न, ज्ञान व उत्साह यांच्यात सातत्य असण्याची आवश्यकता असते असे प्रतिपादन केले. या वेळी २०१८ मध्ये ब्राझिल येथे जागतिक विद्यापीठ स्तरावर भारतीय विद्यापीठाचे नेतृत्व केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
आयोजित विभागीय स्पर्धा मुले व मुली अशी स्वतंत्र पद्धतीने होत असून या स्पर्धेत नाशिक,अहमद नगर, पुणे ग्रामीण व पुणे शहरी संघ सहभागी आहेत, २५ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू, ३ आंतरराष्ट्रीय सहभागी खेळाडू व एक वूमन इंटरनॅशनल मास्टर सहभागी असल्याने अतिशय चुरशीच्या होऊ पाहणाऱ्या या स्पर्धेतून निवडल्या जाणाऱ्या खेळाडूंचा चमू १० ते १२ नोव्हेंबर २०१९ दरम्यान पौर्णिमा विद्यापीठ, जयपूर येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.
पुणे विद्यापीठाचे कुंजीर सर यांनी आपल्या मनोगतात सपट अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कौतुक करत या महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे नियोजन कौशल्याने प्रभावित होऊन तब्बल १६ वर्षानंतर विभागीय बुद्धिबळ स्पर्धा नाशिकमध्ये आयोजित करण्याची संधी प्राप्त झाली असे नमूद केले. 
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे शा. शि. व क्रीडा  संचालक प्रा. गोकुळ काळे यांनी केले.